Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा

पंतप्रधानांचा चंदीगढ दौरा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगढ विमानतळावर नवीन नागरी हवाई टर्मिनलचे उद्‌घाटन चंदीगढ येथील पोस्ट ग्रॅज्यूट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चच्या 34 व्या दीक्षांत सोहळ्यात भाषण करताना पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील जागतिक धर्मपरिषदेत केलेल्या भाषणाची आठवण करुन दिली. विवेकानंदांनी याच दिवशी म्हणजे 11 सप्टेंबर 1893 रोजी विवेकानंदांनी दिलेला मानवतेचा संदेश जगाने लक्षात ठेवला असता तर 9/11 चा दहशतवादी हल्ला झाला नसता, असे पंतप्रधान म्हणाले.

दीक्षांत सोहळ्यासाठी परिसरातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहून पंतप्रधान म्हणाले की, हेच आजच्या सोहळ्याचे खरे प्रमुख पाहुणे आहेत. अशाप्रकारच्या कार्यक्रमांमुळे त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना हा दीक्षांत समारोह म्हणजे शिक्षांत समारोह नसल्याची आठवण करुन देत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना शिक्षण न थांबवण्यास सांगितले. पुस्तकी विश्वातून वास्तव जगात प्रवेश करण्याचा हा क्षण आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी विशेष भर देऊन सांगितले की, आज जे यशस्वी डॉक्टर आहेत त्यांनी केवळ एकट्याने हे यश संपादन केले नाही, तर समाजातील इतरांचेही यात योगदान आहे. आपल्या आयुष्यात या विद्यार्थ्यांनी नेहमी गरीबांचा विचार करावा, अशी विनंती पंतप्रधानांनी केली. सर्वांगीण आरोग्यसेवेबद्दलच्या जागतिक सद्यस्थितीबद्दल पंतप्रधानांनी आपले विचार मांडले. पदवीशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी केवळ आजार बरा करता कामा नये तर त्यांचे रुग्णांसोबत नाते निर्माण केले पाहिजे, अशी विनंती पंतप्रधानांनी केली. गुणवंत विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

पंतप्रधानांनी चंदीगढ येथे सेक्टर-25 मध्ये नव्या गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ केला व जनसमुदायाला संबोधित केले. निवृत्त सैनिकांनी यावेळी पंतप्रधानांचा व्यासपीठावर सत्कार केला. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले- या परिसरातील प्रत्येक कुटुंब म्हणजे देशाला सुरक्षा कवच असल्यासारखे आहे, कारण या भागातील बहुतांश लोक सैन्यदलात कार्यरत आहेत. दिलेल्या वचनाला जागत केंद्र सरकारने एक श्रेणी-एक निवृत्तीवेतन (वन रँक वन पेन्शन) योजनेची अंमलबजावणी केली. याचे श्रेय देशातील गरीब व सामान्य व्यक्तीला जाते.

संसदीय कामकाजात नुकत्याच झालेल्या अडथळ्यांबद्दल खंत व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले की, संसदेच्या कामकाजाचे महत्त्व व संसदेची लोकशाहीतील महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. संसदेत सर्व मुद्यांवर चर्चा झाली पाहिजे, मात्र कामकाजात अडथळा निर्माण व्हायला नको, असे पंतप्रधान म्हणाले. लोकसभेतील अडथळ्यांमुळे मला हे मुद्दे नाईलाजाने जनसभेत (प्रत्यक्ष लोकांमध्ये) उचलावे लागत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

चंदीगढ हाऊसिंग बोर्ड येथे पंतप्रधानांच्या हस्ते नागरिकांसाठी आयटी प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करण्यात आला. प्रशासनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे नागरिक सक्षम होतील, असे पंतप्रधान म्हणाले. 2022 पर्यंत म्हणजे देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत प्रत्येकाला राहण्यासाठी घर असले पाहिजे, असे आपले ध्येय आहे असे पंतप्रधान म्हणाले. वास्तवात उतरवण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

S.Thakur/N.Sapre