पीएम्इंडिया
चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून , पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान ९ व्या ब्रिक्स शिखर संमेलनाला उपस्थित राहतील. ते ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान चीनच्या फुजिआन प्रांताला भेट देणार आहेत.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव यांच्या निमंत्रणानुसार , पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान भेट देणार आहेत. मोदी यांची म्यानमारला हि पहिली भेट असेल. या भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव यांच्या समवेत पंतप्रधान परस्पर हिताच्या बाबींवर चर्चा करतील. राजधानी नाय पै ताव सह यांगून आणि बागंलाही पंतप्रधान भेट देतील.
पीआईबी/ बी. गोखले