पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले.
आर्थिकदृष्टया आणि विशेषत: पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने हवाई जोडणीच्या महत्त्वावर त्यांनी यावेळी भर दिला. हवाई क्षेत्राच्या भविष्यातील दिशा आणि विकासाचा विचार करुन केंद्र सरकारने हवाई वाहतूक धोरणाचे अनावरण केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
कोचीनंतर आता वडोदरा विमानतळ देशातल्या दुसरा पर्यावरण स्नेही विमानतळ झाला आहे, असे ते म्हणाले.
पायाभूत सुविधांची निर्मिती करतांना दिव्यागांच्या आवश्यकतेचा विचार केला पाहिजे, असे पंतप्रधानांनी दिव्यागांना सहाय्यक साहित्य आणि उपकरणांचे वितरण केल्यानंतर सांगितले. केंद्र सरकारच्या सर्व योजनांचे आणि उपक्रमांचे लाभ त्या-त्या लाभार्थींना मिळतील, याची खातरजमा करण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारच्या कामकाजात दलित आणि दुर्लक्षितांसाठीचे उपक्रम केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले.
दारिद्रय, शिक्षणाचा अभाव आणि आरोग्य सेवांची उपलब्धता याच्याशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी विकास हा एकमेव उपाय असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
B.Gokhale/M.Pange/Anagha
A great gift for the citizens of Vadodara…the new terminal building is a big boost to the city’s infrastructure. pic.twitter.com/mdZcNbwyzn
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2016
Aviation sector’s growth will bring more tourists to India, which means more economic opportunities for citizens. https://t.co/78aMS8mW41
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2016
Always special to spend time with my Divyang sisters and brothers. Meeting their families was also very humbling & inspiring. pic.twitter.com/J14scFRCgq
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2016
Be it timely distribution of equipment, job opportunities & focus on accessibility, talked about initiatives of NDA Govt for Divyang welfare
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2016
Let us ensure that every infrastructure we create is sensitive to the requirements of Divyang sisters & brothers. https://t.co/VJv6ZBnWaU
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2016