Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा वाराणसी दौरा

पंतप्रधानांचा वाराणसी दौरा

पंतप्रधानांचा वाराणसी दौरा

पंतप्रधानांचा वाराणसी दौरा

पंतप्रधानांचा वाराणसी दौरा

पंतप्रधानांचा वाराणसी दौरा

पंतप्रधानांचा वाराणसी दौरा


• एकात्मिक ऊर्जा विकास योजनेचा शुभारंभ

• रस्ते व वीज प्रकल्पांसाठी पायाभरणी सोहळा

•बीएचयू येथील ट्रॉमा सेंटरचे लोकार्पण

•रामनगर टपाल कार्यालयात प्रवासी आरक्षण सुविधेचे उदघाटन

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमध्ये एकात्मिक ऊर्जा विकास योजनेचा (आयपीडीएस) शुभारंभ केला. रस्ते व ऊर्जा प्रकल्पांसाठी पायाभरणी सोहळाही पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला. यावेळी रिमोटद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते बनारस हिंदु विद्यापीठातील ट्रॉमा सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. तसेच त्यांनी रामनगर टपाल कार्यालयात प्रवाशांसाठी आरक्षण सुविधेचे रिमोटने उद्‌घाटनही केले.

याप्रसंगी पंतप्रधानांनी म्हटले की, वाराणसी जी पूर्वीपासून लोकांना ज्ञानप्रकाश देत आहे, ती आता देशाला लौकिकार्थाने ऊर्जा प्रकाश देईल. आज वाराणसीमधून देशभर आयपीडीएस योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ते म्हणाले आजच्या सोहळ्यात विविध घटक जसे रस्ते, वीज, आरोग्य प्रकल्प सर्व विकासाला समोर ठेवून आहेत आणि तीर्थकरुंच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी आहेत.

आयपीडीएस योजनेअंतर्गत वाराणसी येथील पुरातन असलेले विजेचे जाळे अत्याधुनिक करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. असे करताना शहराच्या वारशाला जराही धक्का लागणार नसल्याचे ते म्हणाले. आयीपीडीएस योजनेच्या माध्यमातून देशभरातील नागरी भागांमध्येही ही समस्या दूर केली जाणार आहे.

2022 मध्ये, जेंव्हा देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील, तेंव्हा आपण स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या स्वप्नपूर्तीचा एक प्रमुख मुद्दा म्हणून आपण देशभर सर्वांसाठी पूर्णवेळ वीज पुरवली पाहिजे. या मोहिमेसाठी वाराणसीच्या जनतेने आशीर्वाद द्यावे, अशी मागणी पंतप्रधानांनी जनतेकडे केली.

पंतप्रधान म्हणाले की, वाराणसीच्या तरुणांनी ज्यात महिलांचा सुद्धा मोठा सहभाग आहे, त्यांनी स्वच्छ भारत मोहिमेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, याचे प्रतिबिंब शहराच्या घाटांवरुन दिसून येत आहे.

सध्या उत्तर प्रदेशमध्ये सुरु असलेल्या शिक्षक मित्राच्या मुद्यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी खचून जाऊ नये, एकदा का न्यायालयाचा निकाल मिळाला की ते स्वत: खासदार या नात्याने या मुद्यावर उत्तर प्रदेश सरकारशी बोलतील.

पंतप्रधान म्हणाले की, खासगी क्षेत्र व सार्वजनिक क्षेत्र याशिवाय तिसरे क्षेत्र आहे ते म्हणजे वैयक्तिक क्षेत्र. यात लघू व मध्यम उद्योजकांचा समावेश आहे. देशाच्या आर्थिक विकासासाठी व रोजगारासाठी हे महत्वाचे इंजिन आहे. म्हणून मुद्रा बँक व कौशल्य विकास यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

याप्रसंगी उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्री राम नाईक व केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पियुष गोयल उपस्थित होते.

S.Thakur/M.Desai