Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची आयआरआरआय, महावीर फिलिपाईन फाऊंडेशनला भेट

पंतप्रधानांची आयआरआरआय, महावीर फिलिपाईन फाऊंडेशनला भेट

पंतप्रधानांची आयआरआरआय, महावीर फिलिपाईन फाऊंडेशनला भेट

पंतप्रधानांची आयआरआरआय, महावीर फिलिपाईन फाऊंडेशनला भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलिपाईन्समधील लॉस बानोस स्थित इंटरनॅशनल राईस रिसर्च  इनिस्टटयूटला (आयआरआरआय) भेट दिली. आयआरआरआय ही प्रमुख संशोधन संस्था अहे, जी तांदूळ विज्ञान, भाताची शेती करणाऱ्यांचे आणि ग्राहकांचे आरोग्य सुधारणे आणि भावी पिढीसाठी भात शेती पर्यावरण संरक्षणाच्या माध्यमातून दारिद्रय आणि उपासमारी कमी करण्यासाठी समर्पित  आहे.

 

पुराच्या पाण्यात, दुष्काळी स्थितीत तसेच क्षारयुक्त पाण्यात तग धरु शकणाऱ्या तांदळाच्या जाती दाखवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली, आणि महिला शेती सहकारी संस्थांबरोबर आयआरआरआय करत असलेल्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला.

 

पाण्याच्या वेढयात तग धरु शकणाऱ्या तांदळाच्या जातींसाठी नवीन भूखंडाचे प्रतीकात्मक भूमीपूजन पंतप्रधानांनी केले. नरेंद्र मोदी रिसायलिंएट राईस फिल्ड प्रयोग शाळेचे उद्‌घाटनही त्यांनी केले. त्यांनी आयआरआरआय जनुके बँकेला दोन भारतीय तांदळाच्या जातीची बियाणेही भेट दिली.

 

या भेटीदरम्यान, पंतप्रधानांनी आयआरआरआयमध्ये काम करणाऱ्या अनेक भारतीय वैज्ञानिकांशी संवाद साधला.

 

पंतप्रधानांनी मनिला येथे महावीर फिलिपाईन फाऊंडेशनला देखील भेट दिली. भारत आणि फिलिपाईन्स यांच्यातील हा दीर्घकाळ चालत आलेल्या मानवतावादी सहकार्य कार्यक्रम आहे आणि मनिलाचे  भारतीय वंशाचे महापौर डॉ. रमण भगतसिंग यांनी स्थापना केली होती.

 

गरजू अपंगांना जयपूर फूट बसवून देण्याचे कार्य महावीर विकलांग सहाय्यता समितीच्या सहकार्याने हे फाऊंडेशन करत आहे. जयपूर फूटचा लाभ मिळालेल्या लोकांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

  

B.Gokhale/S.Kane/Anagha