Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची याद वाशेम- जागतिक होलोकॉस्ट स्मरण केंद्राला भेट

पंतप्रधानांची याद वाशेम- जागतिक होलोकॉस्ट स्मरण केंद्राला भेट


नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासमवेत आज जेरुसलेममधील याद वाशेम – या जागतिक होलोकॉस्ट स्मरण केंद्राला भेट देऊन अशा छळछावण्यांमध्ये बळी गेलेल्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान हॉल ऑफ रिमेम्बरन्स येथे आयोजित कार्यक्रमातही सहभागी झाले. कॅन्टरच्या “एल मलेह रहमीम” चे भावपूर्ण गायन हा या कार्यक्रमाचा मुख्य भाग ठरला. पंतप्रधानांनी होलोकॉस्टमधील बळींच्या वैयक्तिक कहाण्या सादर करणाऱ्या बुक ऑफ नेम्स हॉललाही भेट दिली.

ही भेट भारत आणि इस्रायलच्या नागरिकांदरम्यानचे दृढ भावनिक बंध आणि मानवी मूल्यांप्रती सामायिक वचनबद्धता अधोरेखित करणारी होती.

सुषमा काणे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai