Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची श्रीमान इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्याशी बातचीत. मालदीवमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीतील त्यांच्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी केले सोलीह यांचे अभिनंदन.


पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी श्री. इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्याशी  दूरध्वनी द्वारे बातचीत केली  आणि काल मालदीवमध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल  पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले.

 श्री. सलीह यांच्या नेतृत्वाखाली मालदीवमध्ये लोकशाही, शांती आणि समृद्धी मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा व्यक्त केली.

 श्री. सोलिह यांनी शुभेच्छा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.

 दोन देशांमध्ये घनिष्ठ, मैत्रीपूर्ण आणि चांगले परस्पर संबंध आणखी मजबूत करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे काम करण्यास  संमती दिली.

                                                                            *****

B.Gokhale