Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचे संकेतस्थळ आता विविध भाषांमधे

पंतप्रधानांचे संकेतस्थळ आता विविध भाषांमधे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालयीन संकेतस्थळ www.pmindia.gov.in आता विविध प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध आहे. हिंदी, इंग्रजी बरोबरच बंगाली, गुजराती, मल्याळी, मराठी, तमिळ आणि तेलगू या सहा प्रादेशिक भाषात हे संकेतस्थळ आता उपलब्ध आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी या संकेतस्थळाचे आज उद्‌घाटन केले. जनतेपर्यंत पोहोचण्याचा, त्यांच्या स्वत:च्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे हा उपक्रम असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितले. या उपक्रमामुळे पंतप्रधान आणि जनता यांच्यात जनकल्याण आणि विकासाशी संबंधित विविध मुद्यांवरचा संवाद अधिकच वृध्दिंगत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. हे संकेतस्थळ इतर प्रादेशिक भाषात टप्प्या-टप्प्याने उपलब्ध होणार आहे.

या सहा प्रादेशिक भाषेतल्या वेबसाईटस् खालील लिंकवर उपलब्ध आहेत.

पीएम इंडिया वेबसाईट बंगाली भाषेसाठीचे संकेतस्थळ www.pmindia.gov.in/bn
पीएम इंडिया वेबसाईट गुजराती भाषेसाठीचे संकेतस्थळ www.pmindia.gov.in/gu
पीएम इंडिया वेबसाईट मराठी भाषेसाठीचे संकेतस्थळ www.pmindia.gov.in/mr
पीएम इंडिया वेबसाईट मल्याळम भाषेसाठीचे संकेतस्थळ www.pmindia.gov.in/ml
पीएम इंडिया वेबसाईट तमिळ भाषेसाठीचे संकेतस्थळ www.pmindia.gov.in/ta

पीएम इंडिया वेबसाईट तेलगू भाषेसाठीचे संकेतस्थळ www.pmindia.gov.in/te

पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित सर्व माहिती या संकेतस्थळावर एकाच ठिकाणी मिळणार आहे. या संकेतस्थळासाठी प्रामुख्याने पीआयबी अर्थात पत्रसूचना कार्यालय मजकूर पुरवणार आहे, तर राष्ट्रीय माहिती केंद्र आणि पंतप्रधान कार्यालय हे वेब ॲडमिनीस्ट्रेटर असेल. प्रशासनिक ट्रॅक रेकॉर्ड, माहितीचा अधिकार, आरटीआय विभाग, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी, पत्रके, फोटोगॅलरी, व्हिडीओ गॅलरी इत्यादी गोष्टी या संकेतस्थळावर उपलब्ध असतील. संकेतस्थळ सुरळित कार्यरत रहावे यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्र आणि पत्रसूचना कार्यालयांच्या सहा प्रादेशिक विभाग कार्यालयांशी समन्वय साधून यंत्रणा सुरु करण्यात आली आहे.

N. Chitale /B.Gokhle