Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचे 11 ऑक्टोबर 2015 रोजीचे कार्यक्रम

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आज मुंबई भेटीवर होते.

पंतप्रधानांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते इंदू मिल परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमीपूजन करण्यात आले.

पंतप्रधानांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू बंदरातील चौथ्या कंटेनर टर्मिनलचा पायाभरणी सोहळा पार पडला. एका पंतप्रधानांच्या हस्ते दोन मेट्रो मार्गांच्या उभारणीचाही पायाभरणी सोहळा पार पडला.

पंतप्रधानांनी सभेला संबोधित करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. इंदू मिल परिसरात जागतिक दर्जाचे स्मारक बांधण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या स्मारकासाठी महाराष्ट्रातील सर्व खेडेगावातील जनतेचा सहभाग आवश्यक असल्याचे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करणार असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

आरक्षण धोरणाचे पुनरावलोकन करणार असल्याच्या अफवांचे पंतप्रधानांनी जोरदार खंडन केले. डॉ. आंबेडकरांनी मिळवून दिलेले लाभ कोणीही काढून घेणार नसल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा विकासासाठी केलेले कार्य, ग्रामीण भागांमध्ये जलयुक्त शिवार राबवल्याबद्दल पंतप्रधानांनी फडणवीस यांच्या कार्याची प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्री श्री सुरेश प्रभू व श्री नितीन गडकरी यांच्या कार्याचीही प्रशंसा केली. देशाचा आर्थिक विकास व मेक इन इंडियाच्या यशासाठी बंदर-आधारित विकास होण्यावर भर देण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

तत्पूर्वी सकाळी, पंतप्रधानांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी व श्री जॉर्ज फर्नांडिस यांची सदिच्छा भेट घेतली.

S. Thakur/S.Tupe