Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत क्षेत्रासंदर्भातील उच्चस्तरीय बैठक संपन्न


s2015020962073 [ PM India 188KB ]

s2015020962074 [ PM India 197KB ]

s2015020962075 [ PM India 210KB ]

पायाभूत प्रकल्‍पांची अंमलबजावणी जलद गतीने व्हावी यासाठी निती आयोगाने आंतर-विभागीय आणि केंद्र तसेच राज्यासंदर्भातील मुद्दयांच्या जलद निर्णयावर लक्ष केंद्रित करावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पायाभूत क्षेत्रासंदर्भातील उच्च स्तरीय बैठकीत ते बोलत होते. ऊर्जा, कोळसा, नवीकरणीय ऊर्जा, बंदरे आणि किनारपट्टी विकास, रस्ते आणि रेल्वे अशा विविध पायाभूत क्षेत्रासंदर्भातील सादरीकरण यावेळी निती आयोगाच्या वतीने करण्यात आले.

20 हजार गावात वीज नाही, तेथे विद्युत जाळे निर्माण करण्यासाठीचे कार्य मोहिमेच्या रुपात करुन ते ठराविक मर्यादेत पूर्ण करावे, असे निर्देशही पंतप्रधानांनी यावेळी दिले.

संपूर्ण ग्रामीण विद्युतीकरणाचे ध्येय सुनिश्चित करण्यासाठी सौर ऊर्जा, रेल्वेसारख्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विद्युत जोडणी आदी कल्पनांच्या कल्पक उपायांचा शोध घेतला लावला जावा, असेही ते म्हणाले. सध्याच्या ऊर्जा प्रकल्पांना भेडसावणारा कोळसा पुरवठयाच्या समस्येचे पूर्ण निराकरण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

देशातील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करण्यासाठीच्या योजनांचा पंतप्रधानांनी यावेळी आढावा घेतला. उदाहरणादाखल सांगताना पंतप्रधान म्हणाले की देशातील सर्व प्रमुख क्रिकेट स्टेडियममधील ऊर्जेचा वापर पारंपारिक ऊर्जेतून सौर ऊर्जेत केला जाऊ शकतो.

सागरमाला प्रकल्पाद्वारे नीलक्रांतीचे आवाहन करत पंतप्रधानांनी किनारी विकासाच्या प्रगतीचा आढावा घेतला. रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाबाबतच्या दृष्टीकोनात मूलभूत बदल झाला पाहिजे, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांबरोबर झालेल्या ब्लॅकरॉक इंडिया इन्व्हेस्टर समिटचा दाखला देत पंतप्रधान म्हणाले की, पायाभूत क्षेत्रासाठी निधी हा अडथळा राहणार नाही. गुंतवणूकीसाठी अनुकूल असा सर्वंकष आराखडा आणि पर्यावरण निर्माण करण्याच्या दिशेन काम करावे अशा सूचना पंतप्रधानांनी यावेळी संबंधित विभागांना दिल्या पायाभूत क्षेत्र मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय, निती आयोग आदी विभागाचे शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.