Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये “ दक्षता जागरुकता सप्ताहा” चा समारोप

पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये “ दक्षता जागरुकता सप्ताहा” चा समारोप


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये “ दक्षता जागरुकता सप्ताहा” चा समारोप आज झाला. नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात हा कार्यक्रम झाला.

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी याप्रसंगी बोलताना केले.

राज्य काही एखाद्याच्या मर्जी अथवा लहरींवर चालत नाही, सरकारची विशिष्ट धोरणं असतात असे सांगून पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, कायदे आणि धोरणं तयार करताना विस्तृत खोलवर विचार करण्याची आवश्यकता असते.