पीएम्इंडिया
टी20 क्रिकेट विश्वचषक जिंकून भारतीय संघाने सिद्ध केले की दृढ निश्चय, संयम आणि आत्मविश्वास यांचा संगम हा जीवनातील यशाचा मूलमंत्र आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. योग्य दिशेने कठोर परिश्रम केल्यास प्रत्येक ध्येय साध्य करता येते हे हा विजय दर्शवितो, असे ते पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित समाज माध्यमावर दिले,
“अभीप्सां स्वात्मनो रक्षाऽविरतं सुस्थिरं तया।
यत्नमातिष्ठ धैर्येण ततः सिद्धिर्भवेद् ध्रुवम्।।”
जीवनात प्रगती साधायची असेल तर सातत्य आणि दृढ निश्चयाने प्रयत्न केले पाहिजेत, सातत्यपूर्ण कठोर परिश्रम आणि संयम यांच्या संगमामुळे नक्कीच यशाचा मार्ग खुला होतो, असा या सुभाषिताचा आशय आहे.
पंतप्रधानांनी एक्सवरील संदेशात म्हटले आहे,
“टी20 क्रिकेट विश्वचषक जिंकून भारतीय संघाने सिद्ध केले की दृढ निश्चय, संयम आणि आत्मविश्वास यांचा संगम हा जीवनात यश मिळवण्याचा मूलमंत्र आहे. हा विजय हेही दर्शवितो की योग्य दिशेने कठोर परिश्रम केल्यास प्रत्येक ध्येय गाठता येते.
अभीप्सां स्वात्मनो रक्षाऽविरतं सुस्थिरं तया।
यत्नमातिष्ठ धैर्येण ततः सिद्धिर्भवेद् ध्रुवम् ।।”
T20 क्रिकेट वर्ल्ड कप जीतकर टीम इंडिया ने साबित कर दिया है कि दृढ़ संकल्प, संयम और आत्मविश्वास का संगम ही जीवन में सफलता का मूलमंत्र है। यह जीत हमें यह भी बताती है कि सही दिशा में कठिन परिश्रम से हर लक्ष्य को हासिल किया जा सकता है।
अभीप्सां स्वात्मनो रक्षाऽविरतं सुस्थिरं तया।… pic.twitter.com/XrUhXbp0tm
— Narendra Modi (@narendramodi) March 9, 2026
***
NehaKulkarni / RshmaBedekar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com