Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते आर्थिक समावेशक उपक्रमाचे उद्‌घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीत अतिशय महत्त्वाच्या अशा आर्थिक समावेशक उपक्रमाचा प्रारंभ केला. या उपक्रमाअंतर्गत एकूण 101 ई-रिक्शा, 501 पेडल रिक्शा, व हातगाड्या देण्यात आला. लाभार्थ्यांना पंतप्रधान जन-धन योजनेअंतर्गत बँक खाते व रुपे कार्ड मिळणार आहे. ई-रिक्शांना जीपीआरएस आणि कॅमेरा यासारखी अत्याधुनिक डिजीटल उपकरणे बसवण्यात आली आहेत.

सिडबी, आयडीबीआय बँक, युको बँक व द अमेरिकन इंडिया फांऊडेशन यासारख्या आर्थिक संस्थांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमावेळी या संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हा कार्यक्रम वाराणसीच्या लोकांचे भविष्य बदलणारा कार्यक्रम ठरेल असे पंतप्रधानांनी जाहीर केले. दारिद्रय निर्मुलनासाठी आतापर्यंत खूप लोक बोलले, पण मागच्या कित्येक दशकांत त्याचे पुरेसे परिणाम दिसून आले नाहीत. दारिद्र्यनिर्मुलनासाठीच्या प्रयत्नांना गती देणे व परिणाम घडवून आणण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भावी पिढ्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी म्हणून गरीब बरीच मेहनत करत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. यासंदर्भात गरीबांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार कौशल्य विकासावर भर देत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

तत्पूर्वी पंतप्रधानांनी ज्या लाभार्थींना रिक्षा व हातगाड्या मिळाल्या, त्यांच्याशी संवाद साधला. मुलांसाठी चांगले शिक्षण, हातगाड्यांच्या माध्यमातून होणारी उत्त्पन्नवाढ ही लाभार्थ्यांची स्वप्न पंतप्रधानांनी जाहीर सभेसमोर विशद केली.

पंतप्रधानांनी रक्षाबंधनानिमित्त वाराणसीहून मोठ्या संख्येने प्राप्त झालेल्या राख्यांचा उल्लेख केला. शुभेच्छा व आशीर्वादाबद्दल त्यांनी वाराणसीच्या माता-भगिनींचे आभार मानले.

S.Thakur/N.Sapre