Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या  हस्ते आसाममधील गुवाहाटी येथे कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन

पंतप्रधानांच्या  हस्ते आसाममधील गुवाहाटी येथे कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील गुवाहाटी येथे ब्रह्मपुत्रा नदीवरील कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी सांगितले की हा पूल गुवाहाटी आणि आसपासच्या परिसरासाठी एक अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या पुलामुळे संपर्क, सोय आणि व्यापारात लक्षणीय वाढ होणार आहे. तसेच भाविकांना कामाख्या मंदिरात अधिक सुलभतेने जाता येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी आपल्या एक्स या समाजमाध्यमा वरील संदेशात सांगितले.

“ब्रह्मपुत्रा नदीवरील कुमार भास्कर वर्मा सेतू हा गुवाहाटी आणि आसपासच्या भागांसाठी अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या पुलामुळे संपर्क, सोय आणि व्यापार मोठ्या प्रमाणात वाढणार असून कामाख्या मंदिरात जाणाऱ्या भाविकांना अधिक सुलभता मिळणार आहे.”

***

शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]