Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते “टाईम्स नाऊ” – अद्‌भूत भारतीय पुरस्कार 2016 प्रदान

पंतप्रधानांच्या हस्ते “टाईम्स नाऊ” – अद्‌भूत भारतीय पुरस्कार 2016 प्रदान


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “टाईम्स नाऊ अद्‌भुत भारतीय पुरस्कार 2016 प्रदान केले. प्रतिकूल परिस्थितीत अनन्यसाधारण कामगिरी करणाऱ्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांच्या जीवनाचा प्रवास एखाद्या हिऱ्यासारखा आहे, ज्याला ओळख आणि मान्यता प्राप्त करण्याआधी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

भारतामध्ये सत्तेत असणाऱ्या अथवा सत्ताधारी वर्गाच्या भोवताली अधिकाधिक चर्चा रेंगाळतात, याबाबत पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. मोठयात मोठी संकटे आणि प्रतिकुल परिस्थितीतही कडवा संघर्ष करुन आदर्श ध्येय प्राप्त करणाऱ्यांना किंवा समाजाची सेवा करणाऱ्यांना कमी ओळखले जाते, असे पंतप्रधान म्हणाले. देशातील शेकडो युवकांना समाजाचे जबाबदार सदस्य बनवण्याची प्रेरणा देणाऱ्या शिक्षकाच्या योगदानाची फार क्वचित दखल घेतली जाते, मात्र दुय्यम राजकीय कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळते. आपल्या वैयक्तिक समस्या आणि अडचणींवर मात करुन समाजासाठी योगदान देणाऱ्या आणि मोठी ध्येये साध्य करणाऱ्या अनेक व्यक्ती जगभरात आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. इतिहास आणि पौराणिक कथांमध्येही हे दिसून येते, हे दाखवून देणारी रामायण आणि महाभारतातील अनेक उदाहरणे पंतप्रधानांनी यावेळी दिली. पंज प्यारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शूर मराठा सरदारांच्या कार्याचेही त्यांनी स्मरण केले.

अशा प्रकारच्या अद्‌भूत भारतीयांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधानांनी टाईम्स नाऊचे अभिनंदन केले. पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांच्या कार्यामुळे इतर अनेकांना प्रेरणा मिळेल, अशा शब्दात पंतप्रधानांनी पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

M. Pange/S.Tupe/M.Desai