Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी

पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी

पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी

पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील द्वारका येथे भारत इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ॲण्ड एक्स्पो सेंटरची (IICC) पायाभरणी केली. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, पर्यावरणाच्या संरक्षणाप्रती भारताची सजगता, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक प्रगती आयआयसीसी प्रतिबिंबित करेल. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि व्यवसाय सुलभतेला महत्त्व देण्याच्या सरकारच्या दूरदृष्टीचा हा एक भाग आहे, असेही ते म्हणाले.

लहान देशांमध्ये परिषदेसाठी आवश्यक जागतिक दर्जाच्या सुविधा असल्यामुळे ते परिषद पर्यटक केंद्र बनले आहेत असे पंतप्रधानांनी नमूद केले. आयआयसीसीच्या निर्मितीमुळे देशात परिषद पर्यटनाची परिसंस्था विकसित करण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत आहे. हे परिषद केंद्र दिल्लीमधील एक छोटे शहर असेल जिथे एकाच ठिकाणी प्रदर्शन, बैठका, बाजारपेठा, कार्यालये आणि मनोरंजन केंद्र असतील. आयआयसीसी भारताला बैठका, प्रोत्साहन, परिषदा या क्षेत्रांमध्ये नवी ओळख मिळवून देईल. हा अब्जावधी उलाढालीचा व्यवसाय आहे असे पंतप्रधान म्हणाले.

सरकारने राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्यामुळे गेल्या चार वर्षात देशात सर्वांगिण विकास झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. जेव्हा योग्य वेळी निर्णय घेतले जातात आणि कुठल्याही विलंबाशिवाय त्यांची अंमलबजावणी केली जाते तेव्हाच देशाचा विकास होतो असे ते म्हणाले. रालोआ सरकारने गेल्या 50 महिन्यात देशहिताचे कठोर निर्णय घेतले आणि यापुढेही घेईल असे ते म्हणाले. पुढील सात वर्षात भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून भारत मार्गक्रमण करत आहे.

हे परिषद केंद्र जागतिक दर्जाचे असल्याचे केंद्रीय वाणिज्य उद्योग आणि नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या भाषणात सांगितले. केवळ भारतातच नव्हे तर जगातील अन्य कुठल्‍याही देशापेक्षा सर्वोत्तम कार्य करण्याच्या पंतप्रधानांच्या नवीन भारताच्या स्वप्नाच्या धर्तीवर हा आयआयसीसी प्रकल्प असल्याचे ते म्हणाले.

प्रस्तावित प्रदर्शन केंद्र, परिषद केंद्र आणि बहुउद्देशीय घडामोडींमुळे 5 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे वाणिज्यमंत्री म्हणाले. रोजगार निर्मिती केवळ आयआयसीसी सुविधांपुरती मर्यादित राहणार नाही तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीही असेल. किरकोळ दुकाने, कार्यालये आणि आदरातिथ्य या क्षेत्रातही नियमित रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

गृहनिर्माण आणि शहरी कामकाज राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) हरदीप सिंग पुरी, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी.आर.चौधरी, डीआयपीपीचे सचिव रमेश अभिषेक, वरिष्ठ अधिकारी, उद्योजक यावेळी उपस्थित होते.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor