Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते भटिंडा येथे एम्सचे भूमीपूजन

पंतप्रधानांच्या हस्ते  भटिंडा येथे एम्सचे भूमीपूजन

पंतप्रधानांच्या हस्ते  भटिंडा येथे एम्सचे भूमीपूजन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमधील भटिंडा येथे अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (एम्स) भूमीपूजन केले.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, की प्रत्येक देशाच्या विकासासाठी सामाजिक पायाभूत सुविधा आवश्यक असून आपल्याला उत्तम दर्जाची शाळा आणि रुग्णालयांची गरज आहे. भटिंडातील एम्समुळे स्थानिक भागांना लाभ होईल. केंद्र सरकार भूमीपूजन करुन थांबणार नाही तर प्रकल्प पूर्णत्वाला नेईल यावर त्यांनी भर दिला. वेळेवर प्रकल्प पूर्ण करण्याला आमचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणले की, भारतीय लष्काराच्या क्षमतेची आता पाकिस्तानला पूर्ण जाणीव झाली आहे. त्यांनी पाकिस्तानच्या जनतेला भ्रष्टाचार आणि बनावट नोटांविरुध्द त्यांच्या राज्यकर्त्यांना लढायला सांगण्याचे आवाहन केले.

शेतकऱ्यांना पुरेसे पाणी देण्यासाठी केंद्र सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करेल असे पंतप्रधान म्हणाले. भारताचे पाणी पाकिस्तानात जाऊ देणार नाही असेही ते म्हणाले.

मध्यमवर्गीयांचे शोषण होणार नाही आणि गरीबांना त्यांच्या हक्काचे मिळेल यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/S.Kane/Anagha