Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते 12 ऑगस्ट रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन


नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ‘ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाईफ, माय स्ट्रगल्स’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील.

भारतातील सार्वजनिक जीवनातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या कोविंद यांच्या आत्मचरित्राचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन, हा त्यांच्या जीवनाचा आणि योगदानाचा गौरव करणारा हृद्य सोहळा ठरेल. या आत्मचरित्रात रामनाथ कोविंद यांच्या विलक्षण जीवनप्रवासातले व्यक्तिगत कथन असून त्यांच्या बालपणापासून ते त्यांच्या गौरवशाली सार्वजनिक जीवनापर्यंत आणि देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी बजावलेल्या सेवेपर्यंतचे अनुभव, संघर्ष व यशाचे चित्रण आहे. हे पुस्तक त्यांचा जीवनप्रवास आणि सार्वजनिक सेवेला आकार देणारी मूल्ये, अनुभव आणि परिस्थिती याबाबत सखोल माहिती पुरवते. 

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai