Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांतर्फे लष्कर दिनानिमित्त भारतीय लष्कराला सलाम


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कर दिनाचे औचित्य साधत, भारतीय लष्कराचे शौर्य आणि त्यांच्या अमुल्य सेवेबद्दल त्यांना सलाम केला.

“सर्व सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना लष्कर दिनाच्या शुभेच्छा. भारतीय लष्कराचे शौर्य आणि त्यांच्या अमुल्य सेवेबद्दल आम्ही त्यांना सलाम करतो.

आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करणे असो की, नैसर्गिक आपत्तींपासून नागरिकांचा बचाव करणे असो, भारतीय लष्कराने नेहमीच सर्व आघाड्यांवर नेतृत्व केले आहे.

आपल्या लष्कराने केलेल्या सर्व बलिदानांचे आपण नेहमी गर्वाने स्मरण ठेवले पाहिजे. १२५ कोटी भारतीयांना आपले आयुष्य शांततेत जगता यावे यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याची जोखीम स्वीकारली आहे.” असे पंतप्रधांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

B.gokhale/ S. Mhatre