पीएम्इंडिया
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे 16-17 डिसेंबर 2025 दरम्यान इथिओपियाला आपला द्विपक्षीय दौरा करत आहेत. आज एडिस आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित एका विशेष समारंभात, इथिओपियाचे पंतप्रधान महामहिम डॉ. अबी अहमद यांनी भारत-इथिओपिया भागीदारी बळकट करण्यासाठी दिलेल्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल आणि जागतिक स्तरावरील राजकारणी म्हणून त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाच्या सन्मान करण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना इथिओपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया’ प्रदान केला.
या प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या इथिओपियाकडून हा पुरस्कार स्वीकारणे हा आपला बहुमूल्य सन्मान असून अत्यंत नम्रतापूर्वक आणि कृतज्ञतेच्या भावनेने आपण हा सन्मान स्वीकारत आहोत, असे त्यांनी नमूद केले. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान डॉ. अबी आणि इथिओपियाच्या लोकांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी पंतप्रधान डॉ. अबी यांच्या नेतृत्वाची आणि राष्ट्रीय एकता, शाश्वत तसेच सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी करत असलेल्या त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. राष्ट्र उभारणीसाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की गेल्या शतकाहून अधिक काळापासून इथिओपियाच्या प्रगती आणि विकासात योगदान देणे हा भारतीय शिक्षकांसाठी एक विशेषाधिकार राहिला आहे.
ज्यांनी अनेक वर्षांपासून इथिओपियसह द्विपक्षीय संबंध जोपासले आहेत, त्या सर्व भारतीय आणि इथिओपियन व्यक्तींना पंतप्रधान मोदींनी हा पुरस्कार समर्पित केला, असून या सन्मानाबद्दल 140 कोटी भारतीयांच्यावतीने मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. हा पुरस्कार प्रदान करणे हे भारत आणि इथिओपिया यांच्यातील घनिष्ठ भागीदारीत आणि ‘ग्लोबल साउथ’च्या सकारात्मक धोरणाला पुढे नेण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण येथे पाहता येईल. [लिंक]
***
NitinFulluke/SampadaPatgaonkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
PM @narendramodi held extensive discussions with PM @AbiyAhmedAli, during which India and Ethiopia decided to elevate their ties to a Strategic Partnership.
— PMO India (@PMOIndia) December 16, 2025
The talks focused on strengthening cooperation in food and health security, capacity building and collaboration on… pic.twitter.com/z0Sx5tMLpm
Held extensive discussions with PM Abiy Ahmed Ali. We have decided to elevate the India-Ethiopia ties to a Strategic Partnership. Gave three key suggestions to enhance bilateral ties:
— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2025
Deepen relations in food security and health security. This includes cooperation in sustainable… pic.twitter.com/QACLRq21Dn
Other aspects that featured in our talks include enhancing collaboration in pharmaceuticals, digital health, medical tourism and more. Sectors such as energy and critical minerals also offer many opportunities.
— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2025