Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी अखिल भारतीय प्राचार्य परिषदेला संबोधित केले

पंतप्रधानांनी अखिल भारतीय प्राचार्य परिषदेला संबोधित केले

पंतप्रधानांनी अखिल भारतीय प्राचार्य परिषदेला संबोधित केले


विद्या भारती अखिल भारती शिक्षा संस्थानने आज नवी दिल्लीत आयोजित केलेल्या अखिल भारतीय प्राचार्य परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.

यावेळी पंतप्रधानांनी समुदायाला विद्या भारतीची प्रतिमा मूल्यांधारित शिक्षण म्हणून अधिक ठळकपणे निर्माण व्हावी या दिशेने काम करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या जीवनातील प्रत्येक बाबीमध्ये सर्वोत्कृष्टता निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याची विनंती त्यांनी प्राचार्यांना केली. उदाहरण म्हणून त्यांनी खेळाडू निर्माण करायला सांगितले जे 2020 च्या ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकं जिंकून देतील.

पंतप्रधान म्हणाले कि, विद्याभारती शाळांचे विद्यार्थी स्वच्छता (स्वच्छ भारत) आणि ऊर्जा बचत (बिजली बचाओ) यांसारख्या क्षेत्रात समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काम करु शकतात.

एलईडी दिव्यांच्या वापरामुळे विजेची बचत करायला मदत होते. हे स्पष्ट करताना त्यांनी विद्याभारती शाळांना या दिव्यांचा अधिकाधिक वापर करायला सांगितले.

शिक्षणाच्या सर्व बाबींमध्ये तंत्रज्ञान आत्मसात करुन त्याचा संपूर्ण लाभ उठवण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. उदाहरण म्हणून त्यांनी विविध शाळांच्या प्रेरणादायी गाथा तंत्रज्ञानाचा वापर करुन विद्याभारती शाळांमध्ये दाखवायला सांगितले.

पंतप्रधानांनी जमलेल्या प्राचार्यांना सकारात्मकता आणि सकारात्मक ऊर्जेचे दीपदर्शक बनण्याचे आवाहन केले.

यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या.

S.Kane/S.Tupe/M.Desai