पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी दूरध्वनीवरुन संभाषण केले.
गेल्या काही वर्षात भारत आणि अमेरिकेतील सहकार्य वृद्धिंगत झाल्याबद्दल आणि सर्वच बाबतीत महत्त्वपूर्ण प्रगतीबाबत दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.
भारत आणि अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी दिलेल्या योगदानाबाबत आणि पाठिंब्याबाबत पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.
पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना त्यांच्या पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar