Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी आयआरएनएसएस-1 जीचे प्रक्षेपण पाहिले, साऊथ ब्लॉकमधून व्हिडिओ-कॉन्फरन्सिंगच्या माध्‍यमातून इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले

पंतप्रधानांनी आयआरएनएसएस-1 जीचे प्रक्षेपण पाहिले, साऊथ ब्लॉकमधून व्हिडिओ-कॉन्फरन्सिंगच्या माध्‍यमातून इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक मधून आय आर एन एस एस-1 जी च्या दिशादर्शक उपग्रहाचे प्रक्षेपण पाहिले. उपग्रह वाहून नेणाऱ्या पीएसएलव्ही प्रक्षेपणाने श्री हरिकोटा येथून दुपारी 12 वाजून 50 मिनटांनी उड्डाण केले.
यशस्वी प्रक्षेपणानंतर काही वेळातच पंतप्रधानांनी व्हिडियो-कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आणि त्यांना संबोधित केले.
ते म्हणाले की, भारतीय वैज्ञानिकांनी अंतराळ विज्ञानात खूप मोठी कामगिरी केली आहे, ज्यामध्ये लोकांचे जीवन बदलण्याची क्षमता आहे.

पंतप्रधान म्हणाले, “या यशस्वी प्रक्षेपणामुळे, आपण आपल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपले मार्ग निश्चित करु शकतो. वैज्ञानिकांनी जनतेला दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे”. ते म्हणाले की त्यांच्या या प्रयत्नांमुळे केवळ भारतालाच नाही तर सार्क देशांना देखील मदत होईल.

S.Kane/BG