Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी आय आय आय टी गुवाहाटीच्या संकुलाचे भूमीपूजन केले, आय आय टी, एन आय टी आणि ईशान्येतील केंद्रीय विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आय आय आय टी गुवाहाटीच्या संकुलाचे भूमीपूजन केले. यावेळी आय आय टी, एन आय टी आणि ईशान्येतील केंद्रीय विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, 21 वे शतक हे ज्ञानाचे शतक आहे. इतिहासात जेव्हा जेव्हा ज्ञान ही जगाची ताकद बनली, तेव्हा भारताने नेतृत्व पुरवले. ते म्हणाले की, आज लोकसांख्यिक दृष्ट्या भारत हा जगातील तरुण देश असून, ऊर्जेने ओतप्रोत भरलेला आहे. जगाचे नेतृत्व करण्याची ही संधी आहे आणि आव्हान देखील आहे.

पंतप्रधान म्हणाले की, आज बहुतांश जागतिक आर्थिक सर्वेक्षणे सांगतात की, भारत जलद गतीने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. केंद्र सरकारने युवकांवर लक्ष केंद्रित केले असून, विचारपूर्वक अनेक उपक्रम सुरु केले आहेत. कौशल्य विकास, मेक इन इंडिया अभियान, स्टार्ट अप चळवळ या दिशेने सरकारने केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला.

इलेक्ट्रॉनिक्स आणि संरक्षण सामुग्री निर्मिती ही प्राधान्य क्षेत्रे असल्याचा खास उल्लेख पंतप्रधानांनी केला.

S. Kane/ S. Tupe/ M. Desai