पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशिया चषक जिंकलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी सांगितले की, संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघाचा आत्मविश्वास, सातत्यपूर्ण कामगिरी आणि उल्लेखनीय जिद्द ठळकपणे दिसून आली.
या विजयामुळे देशभरातील लाखो तरुणांना अधिकाधिक खेळण्यासाठी आणि आपल्या कामगिरीतून उज्ज्वल यश मिळवण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली.
मोदी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे;
“भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण!
आशिया चषक जिंकल्याबद्दल महिला संघाचे अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांचा आत्मविश्वास, सातत्यपूर्ण कामगिरी आणि उल्लेखनीय जिद्द ठळकपणे दिसून आली.
या विजयामुळे देशभरातील लाखो तरुणांना अधिकाधिक खेळण्यासाठी आणि आपल्या कामगिरीतून उज्ज्वल यश मिळवण्यासाठी प्रेरणा मिळो.”
A proud moment for Indian cricket!
Congratulations to the Women’s team on winning the Asia Cup. Their confidence, consistency and remarkable spirit were on full display throughout the tournament.
May this triumph inspire millions of youngsters across the country to play more and shine.
— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2026
नितीन फुल्लुके/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
A proud moment for Indian cricket!
— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2026
Congratulations to the Women’s team on winning the Asia Cup. Their confidence, consistency and remarkable spirit were on full display throughout the tournament.
May this triumph inspire millions of youngsters across the country to play more…