Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी ओमानचे सुलतान यांच्याशी साधला संवाद


नवी दिल्ली,3 मार्च 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानचे  सुलतान माननीय हैथम बिन तारिक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली.

ओमानच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडत्वाचे उल्लंघन झाल्याचा तीव्र निषेध पंतप्रधानांनी या संभाषणादरम्यान केला. या प्रदेशात लवकरात लवकर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी निरंतर राजनैतिक संवाद आवश्यक आहे, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.

भारतीय समुदायाला ओमानकडून मिळणाऱ्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दलही, पंतप्रधानांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.

पंतप्रधानांनी ‘X’ या समाज माध्यमावर लिहिले आहे की:

“माननीय सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी संवाद साधला आणि पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींवर चर्चा केली. ओमानच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडत्वाचे उल्लंघन झाल्याचा निषेध केला. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्यासाठी सातत्यपूर्ण राजनैतिक संवाद आवश्यक आहे, यावर आमचे एकमत झाले. भारतीय समुदायाला ओमानकडून मिळणाऱ्या सततच्या सहकार्याबद्दल मनापासून आभार मानले.

@SultanHaithamb1”

निलीमा चितळे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai