Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी गुजरातमधील साणंद येथे मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्ट आणि पॅकेजिंग (एटीएमपी ) प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी केलेल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केले

पंतप्रधानांनी गुजरातमधील साणंद येथे मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्ट आणि पॅकेजिंग (एटीएमपी ) प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी केलेल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केले


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील साणंद येथे मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्ट आणि पॅकेजिंग (एटीएमपी ) सुविधेच्या उद्घाटनावेळी केलेल्या आपल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केले.

एक्स’ वर केलेल्या संदेशाच्या मालिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की,

मायक्रॉनच्या सेमीकंडक्टर सुविधेचे उद्घाटन हे भारताच्या तंत्रज्ञान नेतृत्वाकडे वाटचालीतील एक मैलाचा दगड आहे.

साणंद येथील मायक्रॉनच्या ATMP सुविधेत व्यावसायिक उत्पादनास सुरुवात झाल्यानंतर भारत जागतिक सेमीकंडक्टर मूल्यसाखळीचा अविभाज्य भाग बनेल आणि या क्षेत्रातील देशाची भूमिका अधिक बळकट होईल.

आज भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्याचे स्पष्ट प्रतिबिंब साणंद येथील मायक्रॉनच्या सुविधेत दिसून येते.

भारत सज्ज आहे. भारत विश्वासार्ह आहे. भारत परिणाम देणारा आहे.

यावर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0’ जाहीर केले आहे. या उपक्रमामुळे देशांतर्गत स्तरावर साहित्य, घटक आणि सेवांच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे.

भारताचे भागीदार तसेच जागतिक गुंतवणूकदारांना मी विश्वास देतो.

भारतासाठी अभिमानाचा दिवस!

मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या सेमीकंडक्टर एटीएमपी सुविधेचे आज साणंद येथे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगातील काही क्षणचित्रे येथे सादर करत आहे.

***

नेहा कुलकर्णी / राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai