Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी गोव्यामध्ये विकास प्रकल्पांची पायाभरणी केली

पंतप्रधानांनी गोव्यामध्ये विकास प्रकल्पांची पायाभरणी केली


गोव्यामधील शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम मधील कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोपा विमानतळ आणि तुआम येथे इलेक्ट्रॉनिक सिटीच्या कोनशीलेचे अनावरण केले.

पंतप्रधानांनी यावेळी विशेष श्रेणीतील नौदल जहाजे उभारणीसाठीच्या पायाभूत सुविधा आणि पाच तटरक्षक गस्त जहाज बांधणी उद्‌घाटनाच्या कोनशीलेचे देखील अनावरण कले.

याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी सर्वप्रथम, काही आठवड्यांपूर्वीच गोव्यात ब्रिक्स परिषदेचे यजमान पद भारताने यशस्वीरित्या भूषवल्याबद्दल संबंधित गटाचे अभिनंदन केले. गोव्याच्या प्रगतीसाठी पंतप्रधानांनी राज्याचे कौतुक केले.

विमानतळ प्रकल्पाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिलेले वचन आता पूर्ण होणार असून याबद्दल आपण खूप आनंदी आहोत. गोव्याला याचा लाभ होणार आहे तसेच यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल असे त्यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पाविषयी ते म्हणाले की, डिजिटली प्रशिक्षित, आधुनिक आणि युवा वर्ग गोव्याचे नेतृत्व करत आहे ज्यामध्ये भारत परिवर्तनाची शक्ती आहे.

500 आणि 1000 रुपयांचे चलन रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविषयी ते म्हणाले की, 8 नोव्हेंबरच्या रात्री भारतातील अनेक लोकांना शांत झोप लागली तर काहींची झोप अजूनही उडाली आहे. काळा पैशाच्या लढाईविरुद्ध भारतातील प्रामाणिक नागरिकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने उचलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. चलनातून नोटा रद्दबातल करण्याची प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे पंतप्रधानांनी यावेळी आभार मानले. आपल्याला देखील दु:खाची कल्पना आहे आणि हे पाऊल कोणतीही अरेरावी दाखवण्यासाठी आपण उचलले नाही असे ते म्हणाले. आपणही गरीबी पाहिलेली आहे आणि लोकांच्या समस्यांची आपल्याला कल्पना आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले.

2014 मध्ये देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी लोकांनी मतदान केले होते याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारद्वारा उचललेल्या अनेक उपाययोजनांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.

जर कोणी भारतात काळा पैसा कमावला आणि ती व्यक्ती देश सोडून गेली तर याचा तपास करणे हे आपले कर्तव्य आहे. मोदी म्हणाले की, आपला जन्म हा कार्यालयात केवळ खुर्चीवर बसण्यासाठी झालेला नाही असे सांगत मोदी म्हणाले की, आपले कुटुंब आणि घर या सगळ्याचा देशसेवेसाठी आपण त्याग केला आहे.

M.Desai/S.Tupe/S.Mhatre/P.Malandkar