पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी ‘नमामी गंगे’ या कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये सरकारने आत्तापर्यंत कोणकोणती कामे कशा पद्धतीने करण्यात आली, याचे सादरीकरण करण्यात आले.
गंगेच्या काठावरील गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढविण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. हरिव्दार, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, पाटणा, भागलपूर, हावडा, आणि कोलकाता या प्रमुख ठिकाणी गंगा दूषित होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
गंगेच्या काठावरील खेडे गावांमध्येही सांडपाण्याची व्यवस्था योग्य प्रकारे केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या बैठकीला पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी, नीति आयोगाचे अधिकारी, जल संसाधन कार्यालय, पेयजल मंत्रालय, तसेच स्वच्छ गंगा आणि मध्यवर्ती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor