Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नाविका सागर परिक्रमेच्या महिला अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या, NM अँपवर शुभेच्छा देण्याचे जनतेला केले आवाहन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाविका सागर परिक्रमेच्या 6 महिला अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या महिला अधिकारी आज आयएनएसव्ही तारिणी मधून जग प्रवासाला निघणार आहेत.

नाविका सागर परिक्रमेच्या चमूला नरेंद्र मोदी ॲपवरून शुभेच्छा आणि प्रोत्साहनपर संदेश देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी सर्वाना केले आहे.

पंतप्रधान म्हणाले, “आजचा दिवस खास आहे ! नौदलाच्या 6 महिला अधिकारी आयएनएसव्ही तारिणी मधून जग प्रदक्षिणेला निघणार आहेत.

नाविका सागर परिक्रमेच्या सर्व महिला चमूला त्यांच्या साहसपूर्ण प्रयत्नांसाठी शुभेच्छा द्यायला संपूर्ण देश एकत्र आला आहे.

नरेंद्र मोदी ॲपवरून तुमच्या शुभेच्छा आणि प्रोत्साहनपर संदेश नाविका सागर परिक्रमेच्या चमूला पाठवा.”

संपूर्ण महिला नौदल अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ही पहिली भारतीय जग प्रदक्षिणा आहे. त्या आज गोव्यातून त्यांच्या प्रवासाला सुरुवात करतील आणि जग भ्रमंती करून मार्च 2018मध्ये गोव्यात परतणे अपेक्षित आहे. या मोहिमेला नाविका सागर परिक्रमा असे नाव देण्यात आले आहे. ही परिक्रमा पाच टप्प्यात पूर्ण केली जाईल, फ्रेमन्टल (ऑस्ट्रेलिया), लिट्लटोन (न्यूझीलंड), पोर्ट स्टॅन्ले (फॉकलंड्स)आणि केप टाऊन (दक्षिण आफ्रिका) या चार बंदरांवर थांबा असेल.

N.Sapre/S.Kane/Anagha