Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नेपाळच्या पंतप्रधानांशी संवाद साधला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये पोलिसांच्या गोळीबारात बिहार मध्यल्या युवकाच्या झालेल्या दुर्देवी मृत्युबद्दल धक्का बसल्याचे सांगून, या घटनेची निंदा केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली यांच्याशी संवाद साधला. या घटनेबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आणि या घटनेबद्दल विस्तृत माहिती द्यावी अशी विनंती केली.

इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठयाबाबत बोलतांना भारताकडून याबाबत कोणतीही आडकाठी नसल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. नेपाळमधल्या समस्येवर लवकर आणि परिणामकारी तोडगा काढण्यासाठी काम करावे, असे पंतप्रधानांनी नेपाळी नेत्यांना सुचवले.

J.Patnakar/S.Tupe