Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी “न्यायिक सुधारणा – सध्‍याचा जागतिक कल” या पुस्तकाचे प्रकाशन केले आणि पहिली प्रत राष्ट्रपतींना दिली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “न्यायिक सुधारणा-सध्याचा जागतिक कल” या पुस्तकाचे प्रकाशन केले आणि या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिली.

पंतप्रधान म्हणाले की, भारताने बदलते तंत्रज्ञान आणि नवीन परस्परावलंबी जागतिक मागणीनुसार आपले पाऊल ठेवले पाहिजे. महत्त्वपूर्ण जागतिक भूमिका पार पडण्याची संधी भारताकडे आहे. याच अनुषंगाने, योग्य धोरणांच्या माध्यमातून या जलद बदलांशी जुळवून घेतले पाहिजे.

अनावश्यक कायदे रद्द करण्याचे वचन पंतप्रधानांनी दिले होते याचा यावेळी मोदींनी पुनरुच्चार केला आणि आत्तापर्यंत केंद्र सरकारने 1200 कायदे रद्द केले आहेत. कार्यक्षम शासन न्यायपालिकेवरील ओझे कमी करु शकते.

N.Sapre/S.Mhatre/D.Rane