Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी ‘पश्चिमबंग दिवस’ कार्यक्रमातील आपल्या भाषणातील प्रमुख मुद्दे सामायिक केले

पंतप्रधानांनी ‘पश्चिमबंग दिवस’ कार्यक्रमातील आपल्या भाषणातील प्रमुख मुद्दे सामायिक केले


नवी दिल्‍ली, 20 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील तारकेश्वर येथे आयोजित ‘पश्चिमबंग दिवस’ कार्यक्रमात केलेल्या भाषणातील प्रमुख  मुद्दे सामायिक केले आहेत.

‘एक्स’ वरील काही पोस्ट्सच्या माध्यमातून मोदी म्हणाले;

“पश्चिम बंगालमध्ये पुन्हा येणे नेहमीच आनंददायी असते!

तारकेश्वर येथील आजच्या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे सादर केली आहेत.”

 

“देशभरातील आपल्या अन्नदात्यांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी आम्ही संकल्पबद्ध आहोत. पश्चिम बंगालच्या हुगळी येथून आज पीएम-किसान चा 23 वा हप्ता वितरित करण्याचे सौभाग्य लाभले. यामुळे कोट्यवधी शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळेल आणि त्यांच्या जीवनात आनंद येईल. ”

 

“जो बंगाल भारताच्या विकासाचे नेतृत्व करू शकला असता त्याची  काँग्रेस, डावे पक्ष आणि टीएमसीच्या अनेक दशकांच्या गैरकारभारामुळे सातत्याने पीछेहाट होत गेली.  आज, ‘पश्चिम बंग दिवस ‘निमित्त, आपण  संकल्प करूया की त्या जुन्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही.”

 

“पश्चिम बंगालमधील माझ्या कुटुंबीयांनी  भाजपाला भरपूर  आशीर्वाद देऊन  विक्रमी जागांनी  विजयी बनवले. आज संपूर्ण देश पाहत आहे की, याचा परिणाम म्हणून लोकांना ते सर्व अधिकार मिळत आहेत , ज्यांपासून त्यांना अनेक वर्षे  वंचित ठेवण्यात आले होते.”

 

“आपली धरतीमाता आणि  शेतांच्या संरक्षणासाठी देशभरातील शेतकरी बंधू-भगिनींना  माझे नम्र आवाहन आहे…”

 

* * *

आशिष सांगळे/सुषमा काणे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai