Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी पीएसएलव्ही सी-31 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल आणि उपग्रह कक्षेत स्थापन केल्याबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या (भारतीय अंतराळ संशोधन संघटना) वैज्ञानिकांशी संवाद साधला आणि पीएसएलव्ही सी-31 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल आणि आयआरएनएसएस 1-ई हा उपग्रह त्याच्या कक्षेत स्थापन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

“पीएसएलव्ही सी-31 चे यशस्वी प्रक्षेपण आणि आयआरएनएसएस 1-ई हा उपग्रह कक्षेत स्थापन केल्याबद्दल इस्रो आणि आपल्या वैज्ञानिकांचे धाडस आणि निर्धाराबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.

इस्रोच्या वैज्ञानिकांशी आज बोललो आणि त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपले वैज्ञानिक आपल्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी करत आहेत”असे पंतप्रधानांनी ट्विट केले आहे.

S. Kane/S.Tupe/M.Desai