Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी बिहारमध्ये रेल्वे पूल प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केले

पंतप्रधानांनी बिहारमध्ये रेल्वे पूल प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पटनामध्ये नवनिर्मित रेल्वे आणि रस्ता पुलाचा रेल्वेचा भाग राष्ट्राला अर्पण केला. हाजिपूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधानांनी मुंगेर येथे नवनिर्मित रेल्‍वे आणि रस्ता पुलावर मालगाडयांच्या कार्यान्वयानाचे आणि मोकामा येथे राजेंद्र पूलानजीक अतिरिक्त पुलाच्या कोनशिलेचे देखील अनावरण केले.

याप्रसंगी उपस्थित जनसमूदायाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, या नवीन पूलामुळे वाहतूकीत सुधारणा होईल आणि यामुळे या भागातील लोकांच्या आर्थिक परिस्थतीदेखील सुधारणा होईल. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते आणि बिहारचे आताचे मुख्यमंत्री नितीश कुमार जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा या प्रकल्पांचे भूमीपूजन झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

संपूर्ण देशाच्या शाश्वत विकासासाठी देशाच्या पुर्वेकडील राज्यांचा विकास होणे आवश्यक आहे असे पंतप्रधानांनी ठासून सांगितले. भारताच्या विकासाचे प्रमुख केंद्र पूर्व भारतात आहे. जर भारताचा विकास करायचा असेल तर बिहारचा विकास करायला पाहिजे असे ते म्हणाले. पायाभूत सुविधांचा विकास आणि विशेषत: रेल्वे आणि रस्त्याचा विकास यामध्येच विकासाचे बीज आहे ज्यामुळे विकासाला गती प्राप्त होईल. रेल्वेचे संपूर्ण आधुनिकीकरण झाले पाहिजे यावर पंतप्रधानांनी यावेळी भर दिला.

S.Mhatre/S.Tupe/M.Desai