Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी बिहार मधील लखीसराई येथे झालेल्या चेंगराचेंगरीतील जीवितहानीबद्दल केले दुःख व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार मधील लखीसराई येथे झालेल्या चेंगराचेंगरीतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या दुःखद प्रसंगी आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी सहाय्य करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वरील संदेशात लिहिले आहे:

बिहार मधील लखीसराई येथील चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीमुळे व्यथित झालो आहे. या दुःखद प्रसंगी माझी सहसंवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करत आहे.

***

NitinFulluke / BhaktiSontakke / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai