पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या महाराणींना आज काही खास छायाचित्रे भेट म्हणून दिली. जानेवारी-फेब्रुवारी १९६१ साली महाराणींनी पहिल्यांदा भारताचा दौरा केला होता; त्यावेळी म्हणजे सुमारे ५४ वर्षांपूर्वीची ही आठवण भेट म्हणून देण्यात आली. महाराणी त्यावेळी प्रजासत्ताक दिनाला मुख्य अतिथी म्हणून भारतात आल्या होत्या. या यात्रेदरम्यान त्यांनी वाराणसी, अहमदाबाद, जयपूर, उदयपूर, कोलकाता, मुंबई, बंगळूरू व चेन्नई सहित इतर काही शहरांचा दौरा केला होता.
३१ जानेवारी १९६१ रोजी घेतलेले पहिले छायाचित्र महात्मा गांधींच्या १३व्या पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी अहमदाबादच्या साबरमती आश्रमाला दिलेल्या भेटीचे आहे. दुसरे छायाचित्र १९ फेब्रुवारी १९६१ रोजी चेन्नई येथे घेतले आहे, त्यावेळच्या मद्रास राज्याने महाराणींच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या समारंभाचे आहे. याप्रसंगी योर्कचे ड्यूक, एच.आर.एच प्रिंस एंड्रयू यांच्या प्रथम जन्मदिवसानिमित्त त्यांना केक सदर करण्यात आला होता. तिसरे छायाचित्र २५ फेब्रुवारी १९६१ रोजी वाराणसी येथे घेण्यात आले होते; बलूआ घाटावरील एका यात्रेत त्या हत्तीवर स्वार झाल्या होत्या. वाराणसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. २४ फेब्रुवारी १९६१ रोजी घेतलेले आणखी एक छायाचित्र महाराणींच्या ट्राम्बे स्थित परमाणु ऊर्जा केंद्राच्या महाराणींच्या भेटीदरम्यानचे आहे.
याशिवाय पंतप्रधानांनी महाराणींना पश्चिम बंगालच्या मकई-बाड़ी चहाच्या बागेतील काही पुरस्कार प्राप्त चहा, जम्मू-काश्मीर मधील उत्कृष्ट सेंद्रिय मध तसेच वाराणसीचे वैशिष्ट्य असलेली तनचोई ओढणी देखील भेट म्हणून दिली.
फोटो ओळ:
३१ जानेवारी १९६१, अहमदाबाद, महाराणींची साबरमती आश्रमाला भेट
१९ फेब्रुवारी १९६१, चेन्नई, प्रिन्स एंड्र्यू यांच्या पहिल्या वाढदिवशी केक कापताना महाराणी
२५ फेब्रुवारी १९६१, वाराणसी, नंदेसार महाल ते बलूआ घाटापर्यंतच्या यात्रेत हत्तीवर स्वार असलेल्या महाराणी
S. Pophale/S.Tupe/N.Sapre
February 19, 1961; Chennai. Her Majesty cutting a cake to celebrate first birthday of Prince Andrew. @TheDukeOfYork pic.twitter.com/2MVZyGqdNO
— PMO India (@PMOIndia) November 13, 2015
February 25, 1961; Varanasi. Her Majesty riding an elephant in a procession from Nandesar Palace to Balua Ghat. pic.twitter.com/JdKzVmazP8
— PMO India (@PMOIndia) November 13, 2015
January 31, 1961; Ahmedabad. Her Majesty visiting Sabarmati Ashram. @BritishMonarchy pic.twitter.com/7z4voa69CZ
— PMO India (@PMOIndia) November 13, 2015
Darjeeling tea from West Bengal, fine organic honey from J&K and Tanchoi stoles from Varanasi. @BritishMonarchy pic.twitter.com/B1NoNAkWQG
— PMO India (@PMOIndia) November 13, 2015
February 24, 1961; Her Majesty The Queen at the Atomic Energy Centre at Trombay. @BritishMonarchy pic.twitter.com/9FJNl3zhds
— PMO India (@PMOIndia) November 13, 2015
During the visit, Her Majesty visited Varanasi, Ahmedabad, Jaipur, Udaipur, Kolkata, Mumbai, Bengaluru & Chennai. @BritishMonarchy
— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2015
These photographs of Her Majesty the Queen date back to the visit when she was the Chief Guest at the Republic Day parade. @BritishMonarchy
— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2015
Presented Her Majesty The Queen some photographs taken 54 years ago from her first visit to India in January-February 1961. @BritishMonarchy
— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2015
Her Majesty The Queen with PM @narendramodi at Buckingham Palace. @BritishMonarchy pic.twitter.com/tDVAuz0D6P
— PMO India (@PMOIndia) November 13, 2015