पीएम्इंडिया
नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री ज्योतिरार्दित्य एम.सिंदिया यांचा एक लेख सामायिक केला आहे. या लेखात भारतीय टपाल विभागाचे (इंडिया पोस्ट) आधुनिक, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या आणि व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित संस्थेत झालेले परिवर्तन अधोरेखित केले आहे. इंडिया पोस्ट आपल्या देशभरातील व्यापक जाळ्याला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देत आहे. त्यामुळे टपाल आणि इतर सामान वाहतूक आणि वितरण व्यवस्था, आर्थिक सेवा आणि नागरिक-केंद्री सेवांमध्ये त्यांची कार्यक्षमता वाढत आहे, असे या लेखात नमूद केले आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर टिप्पणी केली आहे:
“या लेखात ज्योतिरार्दित्य एम.सिंदिया यांनी इंडिया पोस्टचे आधुनिक, तंत्रज्ञान-चलित आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवस्थापित संस्थेत झालेले रूपांतर अधोरेखित केले आहे. इंडिया पोस्ट आपल्या देशभरातील व्यापक जाळ्याला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देत आहे. त्यामुळे टपाल आणि सामान वाहतूक आणि वितरण व्यवस्था,आर्थिक सेवा आणि नागरिक-केंद्री सेवांमध्ये त्यांची कार्यक्षमता वाढत आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. त्याचबरोबर, ‘डाक सेवा, जन सेवा’ या भावनेतून इंडिया पोस्ट आपली विश्वासार्ह सार्वजनिक सेवा देण्याची भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडत आहे.”
In this article, Shri @JM_Scindia highlights India Post’s transformation into a modern, technology-driven and professionally managed institution.
He notes that India Post is combining its vast reach with digital capabilities across logistics, financial services and citizen-centric offerings. At the same time, it continues to uphold its trusted public-service role in the spirit of ‘Dak Seva, Jan Seva.’
— PMO India (@PMOIndia) September 17, 2026
सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
In this article, Shri @JM_Scindia highlights India Post's transformation into a modern, technology-driven and professionally managed institution.
— PMO India (@PMOIndia) September 17, 2026
He notes that India Post is combining its vast reach with digital capabilities across logistics, financial services and… https://t.co/ubLymVR1Jr