Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली


नवी दिल्‍ली, 16 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. दूरदृष्टी लाभलेले एक असामान्य राजकारणी म्हणून त्यांचे स्मरण करत, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला अर्पण केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांच्या विचारांनी आणि कार्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असून त्यांच्या नेतृत्वामुळे देश अधिक बळकट झाला. सुशासन आणि जनकल्याणावर असलेला अटलजींचा कटाक्ष आपल्याला नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत राहील, असे त्यांनी अधोरेखित केले.

‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले :

“अटलजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली. दूरदृष्टी लाभलेले एक असामान्य राजकारणी म्हणून त्यांनी आपले आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण केले. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या नेतृत्वामुळे आपला देश बळकट झाला. सुशासन आणि जनकल्याणावर असलेला त्यांचा कटाक्ष आपल्याला नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत राहील.”

 

* * *

नितीन फुल्लुके/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai