Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी योगाचा परिवर्तनीय प्रभाव विशद करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक


नवी दिल्‍ली, 22 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय योगदिनाला मिळालेले अद्वितीय यश म्हणजे योग हा जगभरातील लाखो लोकांना केवळ शारीरिक आरोग्य मिळवण्यासाठी मदत करत नाही तर त्यांना आत्मविश्वासाने सकारात्मक आयुष्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देत असल्याचे द्योतक आहे.  

पंतप्रधानांनी यासंदर्भात एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे-

“चित्तप्रशमनोपायो योग इत्यभिधीयते। प्राणस्पन्दनिरोधो वा द्वेधा योगस्य धारणा॥”

योग हे चित्तवृत्तीला संपूर्णपणे शांत करुन मनाला आत्मिक स्थैर्य देण्याचे माध्यम आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योगाभ्यासाची  दोन मुख्य साधने आहेत : मनावर नियंत्रण ठेवून ते शांत करणे आणि श्वासोच्छवासावर नियमन ठेवणे.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

”आंतरराष्ट्रीय योग दिनाचे मोठे यश हे याचेच प्रमाण आहे की योग केवळ जगभरातील कोट्यवधी लोकांना शारीरिकदृष्ट्या निरोगी बनवत नाही, तर त्यांना आत्मविश्वासाने सकारात्मक जीवन जगण्यासाठी प्रेरणाही देत आहे.

चित्तप्रशमनोपायो योग इत्यभिधीयते। प्राणस्पन्दनिरोधो वा द्वेधा योगस्य धारणा॥”

* * *

नितीन फुल्‍लुके/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai