Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी विश्व सांस्कृतिक महोत्सव उद्‌घाटन प्रसंगी संबोधित केले

पंतप्रधानांनी विश्व सांस्कृतिक महोत्सव उद्‌घाटन प्रसंगी संबोधित केले

पंतप्रधानांनी विश्व सांस्कृतिक महोत्सव उद्‌घाटन प्रसंगी संबोधित केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत विश्व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्‌घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. “आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन”द्वारे मानवतेच्या सेवेसाठी संस्था करत असलेल्या कार्याला 35 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

विश्व सांस्कृतिक महोत्सवासाठी जगभरातून दिल्लीत एकत्र आलेल्या लोकांना अभिवादन करतांना, 150 देशात आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारा केल्या जाणाऱ्या महान कार्याबद्दल पंतप्रधानांनी श्री श्री रविशंक यांना शुभेच्छा दिल्या.

नरेंद्र मोदी यांनी मंगोलियात आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनद्वारा आयोजित स्वागत समारंभाचे स्मरण करतांना सांगितले की, भारतात योगदान देण्यासाठी जगाजवळ खूप काही आहे, पण यासंदर्भात काही करण्यासाठी, सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय आणि व्यापकतेची प्रशंसा करणे आवश्यक आहे असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जगभरात भारताची प्रशंसा होत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

“आर्ट ऑफ लिव्हिंग”च्या व्याप्तीबाबत बोलतांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणतीही ध्येय साध्य करण्यासाठी दृढ संकल्पाच्या स्वरुपात आर्ट ऑफ लिव्हिगची आवश्यकता आहे असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांच्या आधी जगभरातून मोठया संख्येने आलेल्या मान्यवरांनीही उपस्थितांना संबोधित केले. या विश्व सांस्कृतिक महोत्सवात होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात मोठया संख्येने लोक सहभागी होत आहेत.

J.Patnakar/S.Tupe/M.Desai