Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी शेअर केली केरळममधील एर्नाकुलम येथे झालेल्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमांची झलक

पंतप्रधानांनी शेअर केली केरळममधील एर्नाकुलम येथे झालेल्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमांची झलक


केरळमच्या विकासाला गती देणाऱ्या विविध प्रकल्पांचा आरंभ करण्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोची या चैतन्यशील किनारी शहराला भेट दिली. पंतप्रधानांनी सुमारे 11,000 कोटी रु. खर्चाच्या उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.  उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी कोचीला भेट देणे हा नेहमीच एक अद्भुत अनुभव असतो असे सांगत “या प्रकल्पांसाठी मी केरळमच्या जनतेचे मनापासून अभिनंदन करतो,” असे ते म्हणाले

एक्स समाज माध्यमावर थ्रेड पोस्टच्या माध्यमातून कार्यक्रमाची झलक शेअर करताना मोदी म्हणतात:

” समुद्री शैवाल उत्पादनात सध्या नवीन संधी उदयास येत आहेत. आमचे सरकारही त्याला प्रोत्साहन देत आहे.”
“त्याचप्रमाणे, आम्ही मत्स्यपालनाच्या आधुनिक पद्धतींना देखील प्रोत्साहन देत आहोत.”

 मच्छीमारांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे आमचेच सरकार होते. याचा केरळ राज्याला मोठा लाभ झाला. तसेच या क्षेत्रात एफपीओ (FPOs) वाढताना पाहणे आनंददायी आहे.  

“समाजातील  सामाजिक सौहार्द आणि एकोपा वाढवण्यात अखिला केरळ धीवरा सभेने अत्यंत लक्षणीय योगदान दिले आहे.”

“कोची रिफायनरीमधील पॉलीप्रॉपिलीन युनिटमुळे आत्मनिर्भर होण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल त्याचबरोबर पॅकेजिंग, कापड, ऑटोमोबाईल्स आणि वैद्यकीय उपकरणे यासारख्या अनेक क्षेत्रांनाही त्याची मदत होईल.”

“केरळममध्ये कनेक्टिव्हिटीला चालना!”

***

NehaKulkarni / ManjiriGanoo / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai