Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री महामहिम शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान यांची घेतली भेट

पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री महामहिम शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान यांची घेतली भेट

पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री महामहिम शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान यांची घेतली भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३ सप्टेंबर २०१५) नवी दिल्ली येथे संयुक्त अरब अमीरात (यूएई)चे परराष्ट्र मंत्री महामहिम शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान यांची भेट घेतली. भारतात आयोजित करण्यात आलेल्या आर्थिक व तांत्रिक सहकार्यासाठीच्या भारत-यूएई संयुक्त आयोगाच्या ११व्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते आले आहेत. या बैठकीचे सहअध्यक्ष पद ईएएम कडे आहे.

पंतप्रधानांनी यूएईच्या आपल्या दौऱ्याची आठवण करून देत दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांना नवीन दिशा मिळाली आहे, असे सांगितले. यामुळे दोन्ही देशांना केवळ फायदा होणार नाही तर आशिया तसेच अन्य ठिकाणी शांती व समृद्धी निर्माण करण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. यूएईचे नेतृत्व व दृष्टीकोन यांचे कौतुक करत पंतप्रधान म्हणाले की तिथल्या नेतृत्वाने मानव भावना, नवीन विचार व विज्ञानाचे शक्य ते सर्व प्रयोग करून आपल्या देशाला बदलून टाकले आहे. यूएईच्या जिवंत व बहुसांस्कृतिक समाजाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की यूएईने २.६ दशलक्ष भारतीयांना आपले मानले व त्यांच्या हितांचे रक्षण केले.

पंतप्रधान म्हणाले की दोन आठवड्यापूर्वी त्यांनी केलेल्या यूएई दौऱ्यानंतर लगेचच तिथले परराष्ट्र मंत्री भारतात आले; यामुळे दोन्ही देशातील संबंध पहिल्यापेक्षा अधिक घट्ट झाले आहेत. पंतप्रधानांच्या यूएई दौऱ्यादरम्यान घेतले गेलेले निर्णय कार्यान्वित करण्यासाठी ठोस पावले उचलली गेल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यूएईचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की त्यांचा देश भारताबरोबरील व्यापक भागीदारीला खूप महत्व देतो. त्यांनी यूएईच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला की त्यांचा देश, पंतप्रधानांच्या जुलै २०१५ मधील दौऱ्यादरम्यान झालेल्या निर्णयांची त्वरित अंमलबजावणी करेल; ज्यामध्ये व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, उर्जा, अंतराळ, अपारंपरिक उर्जा, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच उभय देशातील नागरिकांमधील संपर्क यांचा समावेश आहे.

या बैठकीत दोन्ही देशातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात विकास व संयुक्त संशोधनसहित द्विपक्षीय सहकार्य, भारतातील उत्पादन उद्योग तसेच नागरिकांमधील संपर्क दृढ करण्याबाबत चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबू-दाबीच्या युवराजांना भारतात येण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित केले.

S.Pophale/N.Sapre