Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सत्य व अथक प्रयत्नांचे महत्व विशद करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले


नवी दिल्‍ली, 5 मे 2026

 

अथक प्रयासांती आणि सत्याच्या मार्गावर अग्रेसर होऊन मिळवलेले यश चिरस्थायी असते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मनाला अतीव समाधान मिळते असेही त्यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे-

“न तथा बलवीर्याभ्यां जयन्ति विजिगीषवः।

यथा सत्यानृशंस्याभ्यां धर्मेणैवोद्यमेन च॥”

अर्थात – यशाची अभिलाषा ठेवणाऱ्यांना केवळ शक्ती व शौर्यामुळे यश मिळेल असे नाही, तर त्याच्या जोडीला सत्य, करुणा, सदाचार आणि अथक प्रयत्न असतील तरच यशप्राप्ती होऊ शकते. 

पंतप्रधानांनी एक्स वरच्या आपल्या संदेशात लिहिले,

“न तथा बलवीर्याभ्यां जयन्ति विजिगीषवः।

यथा सत्यानृशंस्याभ्यां धर्मेणैवोद्यमेन च॥”

अथक प्रयासांती आणि सत्याच्या मार्गावर अग्रेसर होऊन मिळवलेले यश चिरस्थायी असते. अशा प्रकारे मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मनाला अतीव समाधान मिळते. 

 

* * *

नेहा कुलकर्णी/उमा रायकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai