Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सामायिक केले महर्षी पतंजली आणि योगाभ्यासाच्या गुणांचा गौरव करणारे एक संस्कृत सुभाषित


पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज महर्षी पतंजली यांना अभिवादन करणारे आणि योगाभ्यासाच्या सखोल फायद्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. नियमित योगसाधना केल्याने शरीर सुदृढ आणि मन शांत राहते, तसेच दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवल्याने जीवन संतुलित आणि ऊर्जावान बनते, असे नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. 

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:

” नियमित योगाभ्यासाने शरीर निरोगी आणि मन शांत राहते. त्याला आपल्या दिनचर्येचा भाग बनवल्याने जीवन संतुलित आणि ऊर्जावान बनते.

योगेन चित्तस्य पदेन वाचां

मलं शरीरस्य च वैद्यकेन।

योऽपाकरोत् तं परवरं मुनीनां

पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि॥”

योगाभ्यासाद्वारे चित्तशुद्धी, व्याकरणाद्वारे वाणीशुद्धी आणि आयुर्वेदाच्या मदतीने शरीर शुद्धी करणाऱ्या, तसेच ध्यानमग्न ऋषींमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या महर्षी पतंजली यांना मी हात जोडून वंदन करतो.

***

NehaKulkarni / ShileshPatil / DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai