Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सोनपत येथे तीन महामार्ग प्रकल्पांचे भूमीपूजन केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील सोनपत येथे तीन महामार्ग प्रकल्पांचे भूमीपूजन केले.

पैशांमुळे रस्ते बांधले जात नाही तर रस्त्यांमुळे पैसा निर्माण होतो, असे पंतप्रधानांनी यावेळी एका जनसभेला संबोधित करतांना सांगितले.

विकासासाठी रस्ते आणि ऊर्जा यासारखे पायाभूत सोयी-सुविधा प्रकल्प ही पूर्व आवश्यकता असते, असे पंतप्रधानांनी सांगितले. पायाभूत सोयीसुविधा निर्माण झाल्या की जीवनाचा विकास होतो आणि दर्जाही उंचावतो, असे ते म्हणाले. या महामार्गामुळे हरियाणाच्या विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक गतिमान होण्यासाठी संबंधित प्रक्रिया विना अडथळा आणि सुलभ व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. प्रलंबित प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याला होणाऱ्या विविध मंत्रालय आणि राज्यांबरोबरच्या प्रगती संवादाचाही त्यांनी उल्लेख केला.

1000 दिवसांत देशातील वीज जोडणी नसलेल्या 18 हजार खेड्यांमध्ये वीज पुरवठा करण्याच्या लक्ष्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच 2022 पर्यंत देशाच्या सर्व भागात अखंड वीजपुरवठा करण्याचा उल्लेखही केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चौधरी बिरेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.

J.Patankar/S.Tupe