Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभातील काही क्षणचित्रे सामायिक केली


नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभातील काही क्षणचित्रे सामायिक केली. या समारंभाशी जोडलेल्या भावनिक अनुभवाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी कॅम्पसमधील उत्साहपूर्ण आणि स्वप्नांनी भारलेल्या वातावरणाविषयी मनोगत व्यक्त केले. कोविड महामारीच्या काळात आपण या समारंभाला यापूर्वी आभासी माध्यमातून उपस्थित राहिलो होतो, याची आठवण त्यांनी सांगितली. मात्र, यावेळी पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सहभागी होता आल्याने आपल्याला मनापासून आनंद होत असल्याचे त्यांनी नमूद केले. “आज या कॅम्पसमध्ये तुमच्यासोबत हा अविस्मरणीय अनुभव सामायिक करणे, हे माझ्यासाठीही खूप विशेष आहे,” असे मोदी  म्हणाले.

X वरील पोस्टच्या मालिकेतून क्षणचित्रे शेअर करताना मोदी म्हणाले:

IIT दिल्लीच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून मला अत्यंत आनंद झाला. पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याच्या नव्या अध्यायाच्या सुरुवातीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, आव्हानांचा धैर्याने स्वीकार करावा आणि विकसित भारताच्या उभारणीत योगदान द्यावे, अशी माझी शुभेच्छा.

@iitdelhi

 

IIT दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या ओरिएंटेशनपासून ते दीक्षांत समारंभापर्यंतच्या या खास प्रवासाविषयी बोललो. वसतिगृहातील आठवणी, निर्माण झालेली मैत्री, कॅम्पसमधील आवडती भेटण्याची ठिकाणे आणि गप्पांचे अड्डे—हे सर्व अनुभव आयुष्यभर मनात कायम राहतील.

आपले तरुण पदवीधर आता आयुष्याच्या नव्या अध्यायात प्रवेश करत असताना, या संपूर्ण प्रवासात ज्यांनी त्यांची साथ दिली त्या प्रत्येक व्यक्तीचे मोल त्यांनी जाणावे, असे मी त्यांना आवर्जून सांगितले—त्यांचे मित्र, शिक्षक, मार्गदर्शक आणि सहायक कर्मचारी. आयुष्य त्यांना कुठेही घेऊन जाईल, तरी त्यांनी आपल्या संस्थेशी असलेले नाते कायम जपावे.

@iitdelhi

 

अभूतपूर्व वेगाने बदलणाऱ्या जगासाठी स्वतःला तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानामुळे उद्योग, व्यवसाय, व्यावसायिक क्षेत्रे आणि त्याहीपलीकडील अनेक गोष्टी वेगाने बदलत आहेत.

आव्हाने येणारच; मात्र नवे उपाय शोधण्याचे धैर्य असलेलेच लोक या आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर करतील!

 

IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी बोलताना मी त्यांना एक गोष्ट सांगितली—परीक्षेला अभ्यासक्रमाची मर्यादा असते; मात्र आयुष्याला कोणताही अभ्यासक्रम नसतो. आयुष्य अनेकदा पूर्णपणे ‘आऊट ऑफ सिलॅबस’ असते!

@iitdelhi

 

पूर्वीच्या पिढीने भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षात स्वतःला झोकून दिले. आजच्या युवकांसमोरील जबाबदारी वेगळी आहे; मात्र ती तितकीच महत्त्वाची आहे. आर्थिक आणि तांत्रिक आत्मनिर्भरतेपासून ते औद्योगिक सामर्थ्य निर्माण करण्यापर्यंत, विकसित भारताच्या उभारणीत तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

 

अनेक तरुण आज म्हणत आहेत… “माझ्या कुटुंबाच्या वंशपरंपरेत रॉकेट, चिप आणि ड्रोन तयार करणारा मी पहिला!”

 

* * *

शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai