Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान आजपासून दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर, आफ्रिकन विकास बँकेच्या गांधीनगर इथे मंगळवारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कच्छ इथे विविध विकास कामांची पायाभरणी, पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे. मंगळवारी 23 तारखेला, गांधीनगर इथं आफ्रिकन विकास बँकेच्या वार्षिक बैठकीच्या उद्‌घाटन पर कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत.

दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्याविषयी पंतप्रधानांनी ट्विटरवर काल माहिती दिली आहे.

दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यादरम्यान कच्छ आणि गांधीनगर इथल्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

कांडला बंदरावरच्या विविध प्रकल्पांची कोनशिला बसवल्यानंतर, गांधीधाम इथे जाहीर सभेला, पंतप्रधान संबोधित करणार आहेत.

बचाऊ इथे पंपींग स्टेशनचे उद्‌घाटन केल्यानंतर आपण जाहीर सभेला संबोधित करणार असून, ते मोबाईलवर पाहता येईल http://nm4.in/dnldapp , असे पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

कच्छचे माझ्या मनात विशेष स्थान आहे, असं सांगून इथल्या जनतेत मनमिळाऊ आणि आनंदी वृत्ती आहे.

2001 मधे भूकंपामुळे मोठा विनाश होऊनही, भारताच्या सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा अशी ओळख कच्छने निर्माण केली आहे.

मंगळवारी, @AfDB_Group #AfDBAM2017च्या उद्‌घाटनपर कार्यक्रमासाठी आपण गांधीनगर इथे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

@AfDB_Groupने वार्षिक बैठकीसाठी “आफ्रिकेत, कृषी क्षेत्र संपत्ती निर्मितीचा कायापालट” अशी समर्पक संकल्पना निवडली आहे.

@AfDB_Groupवार्षिक बैठकीदरम्यान,#AfDBAM2017मधे सहभागी होणार असलेल्या काही प्रतिनिधींची आपण भेट घेणार असल्याचे ही पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/D.Rane