पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 24 डिसेंबर 2015 रोजी मॉस्को येथे रशियाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट देणार आहेत.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र हे, बहुस्तरीय समन्वय केंद्र असून ते विविध संस्थांमध्ये समन्वय पुरवण्याचे तसेच लोकांना आणीबाणीच्या स्थितीच्या धोक्याबाबत इशारा देते. या केंद्रात अद्ययावत देखरेख व्यवस्था, माहिती संकलन, विश्लेषण आणि प्रतिकृतीच्या सुविधा आहेत. तसेच या केंद्रात जागतिक दिशादर्शक उपग्रह प्रणाली आणि रिमोट सेन्सिंगवर आधारित जागतिक निरीक्षण तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. रशियाच्या विविध भागातून मिळालेल्या माहितीचे संकलन येथे केले जाते आणि औद्योगिक सुविधा, गर्दीची ठिकाणे, त्सुनामी धोका आणि अन्य आपत्तींवर देखरेख ठेवण्यासाठी हे केंद्र सक्षम आहे.
On his Russia visit, PM Modi will visit National Crisis Management Center and get an overview of its functioning. https://t.co/I8TdMQvAIA
— PMO India (@PMOIndia) December 23, 2015
The NCMC carries out continuous monitoring & data collection, forecasting possible emergencies & informing people in case of an emergency
— PMO India (@PMOIndia) December 23, 2015