Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय क्रीडा दीनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्व क्रीडापटूंना शुभेच्छा


राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांना पंतप्रधानांनी अभिवादन केले आहे.

“क्रीडा क्षेत्राला निष्ठेने वाहून घेतलेल्या सर्व क्रीडा पटू आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना मी राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त शुभेच्छा देतो. आपल्या अद्वितीय कौशल्याने भारतीय हॉकीसाठी असामान्य कामगिरी करणारे मेजर ध्यानचंद यांना माझे अभिवादन”.

“तंदुरुस्ती, तत्पर मानसिकता आणि व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे क्रीडा क्षेत्र”.

भारताला समृद्ध क्रीडा कौशल्य लाभलं आहे. या कौशल्याला वाव मिळावा यासाठी भारतीय क्रीडा क्षेत्राने पोर्टल सुरु केले आहे.

युवकांना त्यांच्या क्रीडाविषयक आकांक्षांना वाव देण्यासाठी , त्यांना योग्य ती दिशा , मार्गदर्शन करण्यासाठी आणि पाठींबा देण्यासाठी नॅशनल स्पोर्ट्स टॅलेंट सर्च पोर्टल सुरु करण्यात आल्याचे पंप्रधान म्हणाले.